इमेल कसा वापरावा
इंटरनेटवरील याहू, रेडिफ, जीमेल अशी अनेक संकेतस्थळे ‘इमेल’ सेवा पुरवीत असतात. इमेलवरून आपण एखादी माहिती सहज मिळवू अथवा पाठवू शकतो. बरेच लोक ह्या संकेतस्थळांवर आपले इमेल अकाउंट तर बनवतात मात्र त्याचा वापर करता येत नाही.
संकेतस्थळावर निर्देश केलेल्या ठिकाणी आपला अचूक युजर आय.डी. आणि पास वर्ड टाकल्यानंतर आपले अकाउंट ओपन होते. त्यात मोबाईलच्या मेसेज बॉक्स मध्ये असतात तसे इनबॉक्स, आउटबॉक्स, आपण बघू शकतो. इनबॉक्स मध्ये आपल्याला आलेले इमेल, आउटबॉक्स मध्ये आपण पाठविलेले इमेल्स असतात. त्याव्यतिरिक्त राईट मेल अथवा कंपोज मेल असा एक ऑप्शन असतो, त्यात जाऊन आपल्याला ज्या पत्त्यावर म्हणजेच इमेल आयडीवर इमेल पाठवायचा आहे तो अचूक पत्ता टाकून, त्याला समर्पक शीर्षक म्हणजे सबजेक्ट द्यावे. नंतर खाली चौकटीत दिलेल्या जागी मजकूर लिहावा. इमेलसोबत एखादी फाईल अथवा फोटो पाठविण्याचीही व्यवस्था असते. सर्व गोष्टी अचूकपणे भरल्यानंतर ‘सेंट’च्या ऑप्शनवर क्लिक केली की इमेल तत्काळ पाठविला जातो. तसा मेसेजही डिस्प्ले होतो. पाठविलेला इमेल ‘सेंट आयटम्स’मध्ये दिसला की इमेल पोहोचला असे समजण्यात येते. इमेल सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे जगात कुठूनही कुठेही सहजपणे तत्काळ माहिती, पत्र पाठविता येते आणि ही सेवा मोफत उपलब्ध आहे, फक्त इंटरनेत सेवेचाच काय तो खर्च येतो!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा